मुंबईकरांनो! पैसे तयार ठेवा; 10% रक्कम भरून म्हाडाचे घर मिळणार, संधी सोडू नका..!

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या योजनेत सुमारे १५० घरांची विक्री लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे इच्छुक अर्जदारांची नजर आता या जाहिरातीच्या तारखेवर खिळली आहे. दरम्यान, मंडळाने जाहिरात प्रसिद्ध करण्याची तयारी अंतिम टप्प्यात नेली असून, काही दिवसांतच ‘बुक माय होम’ या म्हाडाच्या अधिकृत पोर्टलवरून या घरांची थेट विक्री सुरू होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

१०% रक्कम भरली नाही तर अर्ज थेट बाद

या योजनेत ४० लाखांपासून तब्बल ७ कोटी रुपयांपर्यंतच्या विविध घरांचा समावेश होऊ शकतो, अशी जोरदार चर्चा आहे. त्यामुळे इच्छुक खरेदीदारांनी घराच्या एकूण किमतीपैकी १० टक्के रक्कम आधीच हाताशी ठेवणे अत्यंत गरजेचे ठरणार आहे. कारण, सर्वप्रथम अनामत रक्कम जमा करणाऱ्या अर्जदाराला पुढील ४८ तासांच्या आत ही १०% भरपाई अनिवार्यपणे भरावी लागेल. ठरलेल्या वेळेत ही रक्कम भरली नाही, तर संबंधित अर्ज तात्काळ रद्द केला जाईल आणि पुढील प्रतीक्षेत असलेल्या अर्जदाराला घराची संधी दिली जाईल.

सूत्रांच्या माहितीनुसार, या घरांची थेट विक्री ‘बुक माय होम’ या म्हाडाच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून करण्यात येणार आहे. इच्छुकांना नोंदणीसाठी काही दिवसांची मुदत दिली जाईल. या प्रक्रियेत अर्जदारांना आधारकार्ड, पॅनकार्ड आणि जातवैधता प्रमाणपत्र अशी आवश्यक कागदपत्रे अपलोड करून नोंदणी पूर्ण करावी लागेल. नोंदणी झाल्यानंतर अनामत रक्कमेसह अर्ज स्वीकारले जातील. आणि ज्याने संबंधित घरासाठी सर्वांत आधी अनामत रक्कम भरून अर्ज सबमिट केला, त्या अर्जदाराच्या नावावर ते घर लगेच आरक्षित केले जाणार आहे.

१०% भरल्यानंतर ९० दिवसांची मुदत; अतिरिक्त वेळेत व्याज आकारले जाणार

अर्जदाराने प्रारंभीची १० टक्के रक्कम जमा केली की, उर्वरित ९० टक्के रकमेसाठी त्याला पूर्ण ९० दिवसांचा अवधी मिळणार आहे. या ठरलेल्या कालावधीत संपूर्ण भरपाई शक्य नसेल, तर अर्जदाराला आणखी ९० दिवसांची वाढीव मुदत मिळू शकते. मात्र, या अतिरिक्त कालावधीत नियमानुसार व्याज आकारले जाईल, अशी माहिती मुंबई मंडळातील सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे, ‘प्रथम प्राधान्य’ योजनेतील बहुतेक घरांची किंमत एक कोटी रुपयांहून अधिक असल्याने, प्रारंभीची १० टक्के रक्कम तयार ठेवणे इच्छुकांसाठी निर्णायक ठरणार आहे.

Leave a Comment

Join WhatsApp Group