Construct home in 24 hours : भविष्यात तुमचं घर उभं राहणार आहे मनुष्यांच्या हातांनी नाही, तर अत्याधुनिक मशीनने — आणि तेही अवघ्या 24 तासांत! ऑस्ट्रेलियातील क्रेस्ट रोबोटिक्सने अशी अनोखी मशीन तयार केली आहे जी सिमेंट किंवा विटांशिवाय प्रचंड वेगाने घर बांधू शकते. आश्चर्य म्हणजे, ही एकटी मशीन एकाच दिवसात 100 मजूरांचं काम करू शकते. या तंत्रज्ञानामुळे बांधकामाचा वेळ आणि खर्च दोन्ही मोठ्या प्रमाणात कमी होतात. तसेच पर्यावरणाला होणारे नुकसानही घटते. विशेष म्हणजे, ही मशीन दुर्गम भागातसुद्धा सहजपणे कार्य करू शकते, ज्यामुळे अशा ठिकाणी वेगाने आणि कमी खर्चात घरे उभारणे शक्य होणार आहे.
‘शार्लोट’ नावाची मशीन — घर बांधण्याची नवी क्रांती
ऑस्ट्रेलियन इंजिनिअर्सनी ‘शार्लोट’ नावाचा एक खास 3D-प्रिंटिंग रोबोट तयार केला असून, त्याची रचना कोळ्याप्रमाणे दिसते. हा रोबोट माती, वाळू, पुनर्वापर केलेला स्वच्छ कचरा किंवा आसपास उपलब्ध असलेल्या नैसर्गिक सामग्रीचा वापर करून संपूर्ण घर तयार करतो. या पद्धतीमुळे बांधकामाचा खर्च प्रचंड कमी होतो आणि पर्यावरणाचं नुकसानही न्यूनतम राहतं.
सिडकोची जबरदस्त ऑफर! फक्त एवढ्या लाखात घर
शार्लोट काम कसं करतो?
क्रेस्ट रोबोटिक्स आणि अर्थबिल्ट टेक्नॉलॉजी यांनी संयुक्तपणे ही यंत्रणा विकसित केली आहे.
लांब पाय, हलकी रचना आणि उत्कृष्ट बॅलन्स यामुळे हा रोबोट कोणत्याही उबडखाबड भूभागावर सहज फिरू शकतो. शार्लोट अनेक थरांमध्ये माती घट्ट दाबून भिंती तयार करतो आणि त्यामुळे पारंपरिक बांधकामात लागणाऱ्या ऊर्जा आणि कार्बन-गहन प्रक्रियांची गरजच राहत नाही.
सिडकोची जबरदस्त ऑफर! फक्त एवढ्या लाखात घर
वेग, खर्च आणि उपयोग — अनेक फायदे एका रोबोटमध्ये
100 कामगारांपेक्षा जलद बांधकाम. काही तासांत संपूर्ण घर तयार करण्याची क्षमता. गृहनिर्माण टंचाई असलेल्या भागात मोठा फायदा. कमी खर्चात, टिकाऊ आणि पर्यावरणपूरक बांधकाम. मजुरांची कमतरता असलेल्या किंवा दुर्गम भागात सहज वापर. तरीही, या वेगाने वाढणाऱ्या ऑटोमेशनमुळे बांधकाम क्षेत्रातील रोजगारावर होणारा परिणाम हा चिंतेचा विषय ठरत आहे. शास्त्रज्ञांच्या मतानुसार, रोबोट्स धोकादायक आणि अवजड काम सांभाळतील, तर मानव अधिक कौशल्याधारित कामांकडे वळतील.
चंद्रावर घरे बांधणे आता स्वप्न नाही?
शार्लोटची हलकी, फोल्ड होणारी रचना भविष्यात चंद्रावर घर बांधण्याच्या मोहिमेतही उपयोगी ठरू शकते, असा संशोधकांचा विश्वास आहे.
चंद्राच्या मातीपासून तयार होणाऱ्या जिओपॉलिमरचा वापर करून मजबूत रचना उभारता येऊ शकते आणि शार्लोटचे तंत्रज्ञान विविध माती व पृष्ठभागानुसार स्वतःला अॅडजस्ट करते. भविष्यात जेव्हा चंद्रावर पहिली मानवी वसाहत उभी राहील, तेव्हा अशा रोबोट्सचा वाटा महत्त्वाचा असणार यात शंका नाही.