होम लोनवर 4% व्याज सबसिडी; मोदी सरकारचं मोठं गिफ्ट, याच लोकांना मिळणार लाभ..!

मुंबई : स्वतःच्या घराचे स्वप्न अनेकांच्या मनात असते, पण वाढते दर आणि मोठे कर्ज यामुळे ते पूर्ण करणे अनेकांसाठी कठीण ठरते. बहुतांश लोक आयुष्यभराची कमाई एकत्र करूनच घर मिळवतात. मात्र केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी हे स्वप्न साकार करण्याचा मार्ग खुला केला आहे. नेमकं कसं? पाहूया…

मोदी सरकारची गृहनिर्माण योजना अनेक कुटुंबांसाठी मोठा आधार ठरू शकते. विशेषत: घर घेण्याची इच्छा असली, तरी महाग EMI आणि उच्च व्याजदरामुळे मागे हटणाऱ्या लोकांसाठी ही योजना खूप महत्त्वाची आहे. अशांसाठीच Pradhan Mantri Gramin Awas Yojana आणि तिचा अद्ययावत रूप PMAY-Urban 2.0 मोठा दिलासा देतात.

2024 मध्ये केंद्र सरकारने PMAY-Urban 2.0 ला मंजुरी दिली. या योजनेत मध्यमवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) आणि कमी उत्पन्न गट (LIG) या सर्वांसाठी त्यांच्या पहिल्या घराच्या खरेदीवर व्याज अनुदानाचा थेट फायदा उपलब्ध आहे. मात्र हे अनुदान फक्त ₹35 लाखांपर्यंतच्या घरांसाठी लागू असेल आणि घेतलेले कर्ज ₹25 लाखांपेक्षा जास्त नसावे.

कर्जाचा कालावधी 12 वर्षांपर्यंत असेल, तर ₹8 लाखांपर्यंतच्या कर्जावर 4% व्याज अनुदान मिळू शकते. म्हणजेच EMI वरचा भार लक्षणीय कमी होतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आहेत –अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न ₹9 लाखांपेक्षा कमी असावे, देशात अर्जदाराच्या किंवा कुटुंबाच्या नावावर कुठेही घर नसावे

हे अनुदान एकूण ₹1.80 लाख असून, सरकार ते 5 हप्त्यांत थेट बँक खात्यात जमा करेल. लाभार्थी आपले अनुदान स्टेटस वेबसाइट, ओटीपी किंवा स्मार्ट कार्डच्या माध्यमातून पाहू शकतात. या संपूर्ण प्रकल्पासाठी सरकारने तब्बल ₹2.30 लाख कोटींची तरतूद केली आहे. पुढील पाच वर्षांत या योजनेचा लाभ 1 कोटी नवीन शहरी कुटुंबांना मिळेल, असा सरकारचा अंदाज आहे

Leave a Comment

Join WhatsApp Group