कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि ग्राहकांसाठी आजची बातमी खूपच महत्वाची आहे. कारण बाजारात पुढील काही दिवसात मोठ्या हालचाली घडण्याची शक्यता आहे. अलीकडच्या घडामोडींमुळे कांद्याच्या भावात वाढ होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. नेमकी वाढ किती होणार? यामागे नेमके कारण काय आहे? याबाबत माहिती जाणून घेऊया..
रब्बी हंगामातील कांदा लागवड यंदा अपेक्षेपेक्षा खूपच मंद गतीने सुरू आहे. ऑक्टोबरच्या अखेरीस आणि नोव्हेंबरच्या सुरुवातीला पडलेल्या अवकाळी पावसाने कांद्याच्या रोपांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं, परिणामी लागवडीच्या कामाला मोठा फटका बसला आहे.
सद्यस्थितीत राज्यात फक्त 73,581 हेक्टरवरच कांदा लागवड पार पडली असून, हे प्रमाण नेहमीच्या तुलनेत खूपच कमी आहे. डिसेंबरअखेर साधारण 80 टक्क्यांपर्यंत लागवड पूर्ण होणं अपेक्षित असतं; पण यंदा ते प्रमाण केवळ 40 टक्क्यांवर थांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लागवडीतील ही घट पुढील काही महिन्यांत कांद्याच्या बाजारातील पुरवठ्यावर थेट परिणाम करू शकते, आणि त्यामुळे भाव वाढण्याचे संकेत आधीच दिसू लागले आहेत.